top of page

समृद्ध मराठी चेम्बर ऑफ कॉमर्स 

अंतर्गत 

कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स 

नियमावली 

  • कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स हा समृद्ध मराठी चेम्बर ऑफ कॉमर्स या संस्थेचा विभाग आहे. कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स हे कोकणवासीय व्यावसायिक व उद्योजक याना एकमेकांच्या उत्कर्षांसाठी सकारात्मक विचार विनिमय व ठोस कृतींकरता एकत्र आणण्याच्या दृष्टीने निर्माण केलेलं व्यासपीठ आहे. या व्यासपीठाद्वारे मिळणाऱ्या सेवा सुविधांचा उपयोग सदस्यांना त्यांच्या उद्यम व्यवसायाच्या विकासासाठी व्हावा व विकासातून सर्वसामान्यांसाठी रोजगार तथा उपजीविकेच्या साधनांची निर्मिती व्हावी, हे या चेम्बर च्या स्थापनेमागील मूळ उद्दिष्ट्य आहे. 

  • चेम्बर च्या माध्यमातून सहा महिन्यांनी एक स्नेह भोजनाचा आणि प्रत्येक महिन्यात एक चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. यात कोकणातील मोठे उद्योजक सहभागी होतील. यातून सर्व कोकणी उद्योजकांना एकत्र आणून उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले जातील.​

  • दरमहा होणाऱ्या संमेलन/बैठक/चर्चा कार्यक्रमात सहभागी होऊन आपले ज्ञान व अनुभव यांचा लाभ प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांना द्यावा. चर्चा, विचार विनिमय केवळ सकारात्मक असावेत आपला सध्याचा व भावी उद्यम व्यवसाय आणि आपण करीत असलेले व्यवहार व कामे यांच्याशी निगडित बाबी, यांवर चर्चा केंद्रित असावी. 

  • कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स द्वारा मिळणाऱ्या सेवा सुविधांकरिता सर्व साधारणपणे काही ना काही मूल्य, सेवा शुल्क असेल, विनामूल्य सेवेची अपेक्षा नसावी. 

  • कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स च्या सदस्यांनी एकमेकांना व्यवसायीक पद्धतीने मदत करावी व त्याकरिता वाजवी सेवाशुल्क आकारावे असे अभिप्रेत आहे. चेम्बर च्या सदस्यांनी व्यवसायीक व आर्थिक फसवणूक अथवा दुराचार करू नये. अशी बाब आढळून आल्यास अश्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार अनुशासन समितीस असेल. 

  • कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स च्या प्रेरणेतून कोकणात विविध प्रकारचे वैयक्तिक प्रकल्प, उद्यम व व्यवसाय स्वतंत्रपणे अथवा सहकारी तत्वावर (एकत्रितपणे)  उभे राहू शकतील या करिता आवश्यक तो सल्ला तथा मार्गदर्शन त्या त्या विषयातील तज्ज्ञाकडून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील परंतु या प्रकल्प, उद्यम, व्यबसायाच्या आर्थिक व इतर व्यवहाराशी चेम्बर चा संबंध मुळीच असणार नाही. या प्रकल्प उद्या व्यवसायाचे यशापयश आर्थिक फायदा तोटा साहजिकच त्याच्या एकूण नियोजन व व्यवस्थापनावर अवलंबून राहील.

  • कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स च्या व्यासपीठाशी संलग्न होऊन एकत्र आपल्यामुळे मिळणाऱ्या सोयी सुविधा या सदस्यांच्या सकारात्मक व परस्पर सहकाराच्या भावनेवर व कृतिशीलतेवर मुख्यत्वे अवलंबून असल्याने या सेवा सुविधांकडे आपला अधिकार व हक्क म्हणून सभासदांनी पाहू नये. यात काही वाढ घट होणे व्यावहारिक आणि स्वाभाविक आहे. 

  • चेम्बर च्या सदस्याला व त्याने शिफारस केलेल्या व्यक्तीला शासकीय व इतर कोणत्याहो स्रोतांकडून आर्थिक मदत, अनुदान, सबसिडी, कर्ज वा एखादी इतर सवलत सूट, परवाना, मंजुरी आदी मिळवून देण्याची जबाबदारी चेम्बर कदापिही स्वीकारणार नाही, मात्र सभासदांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्यांच्या व्यवसाय उद्यमांशी संबंधित सर्वसाधारण स्वरूपाच्या अडचणी/ समस्यांचे निराकरण व्हावे या दृष्टीने व धोरण विषयक बाबींवर योग्य तो निर्णय विनाविलंब व्हावा या उद्देश्याने शासनाच्या विविध विभागांकडे वा संबंधित प्राधिकरणाकडे उचित पातळीवर चेम्बर च्या माध्यमातून योग्य ती कैफियत व प्रस्ताव मांडून त्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला जाईल 

  • कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स च्या सभासदांमधील संबंध सौहार्दपूर्ण असावेत. चेम्बर मध्ये नकारात्मक चर्चा, वितंडवाद, व्यक्तिगत हेवेदावे, गटबाजी आदी अपप्रवृत्तीना स्थान नसावे व त्या टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सर्व सभासदांकडून अपेक्षित आहे. अश्या प्रकारच्या अपप्रवृत्ती वा गैरप्रकार दुर्दैवाने आढळून आल्यास संबंधित सदस्यांचे सदस्यत्व संबंधित क्षेत्रीय संघटकांची मते आजमावून रद्द करण्याचा अधिकार अनुशासन समितीस आहे. 

  • कोकण चेम्बर ऑफ कॉमर्स च्या सभासत्वाचा अर्ज करताना दोन पासपोर्ट साईझ फोटो देणे बंधनकारक आहे. सभासत्वाचे शुल्क पूर्ण एकरकमी भरणेही आवश्यक आहे. 

  • सभासदांमधील किंवा सभासदांशी झालेल्या कोणत्याही आर्थिक किंवा इतर व्यवहारांसाठी चेम्बर अथवा चेम्बर चे कार्यकारिणी सदस्य कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत.  

 

  • मल्टि लेव्हल (नेटवर्क) मार्केटिंग संबंधित असलेल्या सदस्यांनी इतर सभासदांना भेटणे व फोन करणे या गोष्टी काळ वेळेचे बंधन पळून कराव्यात. एखाद्या सभासदाकडून या बाबत तक्रार आली असता संबंधित सभासदाचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळ राखून ठेवत आहे. 

  • कोणत्याही व्यक्तीला सभासत्व नाकारण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला राहील 

  • वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला राहील 

  • वरील नियम आणि अन्य नियमावली मध्ये कोणतेही बदल करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला राहील 

  • चेम्बर च्या विविध परिषदा, प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यास दौरे, यासाठी शुल्क असेल परंतु चेम्बर च्या सभासदांना या शुल्कामध्ये सवलत मिळेल. 

bottom of page